एप्रिल २०२०

काय चालंलय ,,,?

 काय चालंलय ?
--------------
" दिसला नाहीत
बरेच दिवसात ?
आहात कुठे ...? "

"इथेच आहे
जाणार कुठे ?"

" कथा नाही
लेख नाही,
कविता नाही
कादंबरी नाही
टीका नाही
टिप्पणी नाही,

बरं लिहीता
म्हणून विचारलं,
मग काय 
सध्या घरीच...?"

" हो, घरीच
एकांतात बसतो
अंतरंग पाहात...?

" मग .......?
दिसलं का ?
अंंतरंग .......?"

" छे  हो
कसं दिसेल 
आत काळोख
चांचपडून पाहातो
खडबडीतपणाच जास्त
मऊपणा,  सुखावहता
नाहीच कशी....? "

" बाहेर येता....? "

" बाहेर नको,
जे बाहेर
तेच आत
विरोधाकरिता विरोध
बाहेरच्या सारखाच....?

" या केव्हातरी
गप्पा मारायला....?

बाहेरच्या जगातलं
केविलवाणं आमंत्रण

" नक्कीच नक्कीच ..! "

" नमस्कार, नमस्कार"

" या बरं का ! "

"हो हो ....अगदी नक्कीच
टाटा, बाय्, बाय्  ! "

 ते विरत विरत 
नाहीसे झाले

मी थिजलो
पुन्हा वितळण्यासाठी.
Post to Feed


Typing help hide