........असे उष:काल उद्याचा

शांत नीरव वातावरणी

कुठे विराणी,कुठे भैरवी
जीवनातुनी दर्द पळाला
सुचेना शायरी अन् गझला
शब्दापुढे शब्द कवितेचे
अनुभव चार भिंतीत कोंडले
कल्पनेतही दारिद्र्य बोचरे
भावनांचे कहर संपले
देता आव्हान ओसाडपणासी
भुते नाचती रस्त्यावरती
वेताळाची वस्ती सगळी
कुत्रे भुंकुनी गाणे म्हणती
माणुसकीचे मढे सडले
रुमाल नाकी बांधुनी पेलले
दोघे चौघे श्रीराम म्हणाले
मडके फुटके पाणी लाजले
तरीही जगती आशेवरती
नाती , गोती अन् प्रणयगाणी
म्हणत मुखानी सारे जगती
"रात्रीच्या गर्भात असे....."
(उष:काल उद्याचा )