एप्रिल २३ २०२०

निवडक अ-पुलं

नमस्कार! 'निवडक अ-पुलं' हे माझं पुस्तक अलीकडेच प्रसिद्ध झालं! 

या माझ्या पुस्तकात 'मनोगत' आणि अर्थात 'मनोगतीं'चा मोठा सहभाग आहे. आपणां सर्वांचे मनः पूर्वक आभार! 

'निवडक अ-पुलं' कागदविरहित ('इ-बुक') या स्वरूपात 'ऍमेझॉन' वर उपलब्ध आहे आणि कुठल्याही 'हुशार भ्रमणध्वनी' (स्मार्ट फोन') वर ते आपण वाचू शकता. 'किंडल' हे माध्यम ('ऍप') वापरून. 'किंडल अनलिमिटेड' चे आपण जर सदस्य असाल तर ते आपणांस विनामूल्यही मिळू शकेल.

पुस्तकाविषयी थोडं -

पु, लं. चा विनोद आपल्याला पुनः पुन्हा हसवत असतो. त्यांची आठवण, त्यांची पात्रं आणि त्यांच्यासारखी शैली पुनश्च वाचकांसमोर आणण्याचा हा प्रयत्न! माझ्या मी 'मनोगत' तसंच 'लोकसत्ता', 'लोकमत' इत्यादी वर्तमानपत्रांमधून लिहिलेल्या 'पु. ल. अखेरचा अध्याय', 'बटाट्याची चाळ, बाजीराव आणि मस्तानी', 'गाळीव इतिहास' इत्यादी कथांमधून / लेखांमधून. 

आणि त्याचबरोबर थोडं अ-पुलंही (आणि थोडंसं अप्रकाशितही)! -

काळानुसार बदललेल्या अनेक नवीन व्यक्ती आणि वल्लींतून. 
अन् प्रसिद्ध घटनांच्या आणि व्यक्तिमत्त्वांच्या उडवलेल्या खिल्लीतून!

बाकी काय? 

‘'पुलोच्छिष्टम् जगत् सर्वम्' हेच खरं!

भारतात विकत घेण्याचा दुवाः

https://www.amazon.in/dp/B086YZNVWH

(इतर देशांतही ते 'ऍमेझॉन'वर उपलब्ध आहे. आपण ते 'jawadekar' या नावानं शोधू शकता.)

यूट्यूबः 

७ मार्च २०२० रोजी मँचेस्टर (इंग्लंड) इथे झालेल्या 'बिल्वदल' या कार्यक्रमात मी सादर केलेला 'पु. ल. अखेरचा अध्याय' -

https://youtu.be/6YIyNp2SkT0

पुनः एकदा सर्व मनोगतींना मनः पूर्वक धन्यवाद!

आपला,
कुमार जावडेकर

Post to Feedअभिनंदन!
धन्यवाद

Typing help hide