एप्रिल २९ २०२०

कशात काय अन् कशात काय ?

आजकाल विश्वासात
श्वास आहे
पण श्वासात 
विश्वास नाही

प्रेमात प्रतारणा आहे
पण प्रतारणेत 
प्रेम नाही
जगण्यात आनंद आहे
पण आनंदात 
जगणं नाही

दु:खात सूख आठवतं
पण सुखात दु:ख 
आठवत नाही
सत्यातलं असत्य उघडतं
पण असत्यातलं सत्य
लपून राहतं

माणुसकीला जाळू नका
क्षमाशील राहा
जीवन आनंदाने भरेल
जीवन आनंदाने भरेल


Post to Feed


Typing help hide