का कळेना

माझ्यात खोलवर इतकी  रुजलीस का कळेना
जहर अंतरीचे शोषिलेस का कळेना

प्रेमात माझिया तू बुडलीस का
कळेना 
स्वप्नातील रंग सारे उडले कधी कळेना

त्या रात्री  आठवणींनी जागलीस का कळेना
नि:शब्द प्रणय याचना ती केलीस का कळेना

कैफात शब्द मिटता थांबलीस का कळेना
एकांत पूर्ण मिळताही सुकलीस का कळेना