फेब्रुवारी २०२१

स्प्राऊट मूग सँडविच

जिन्नस

  • मोड आलेले मूग एक पाव, कोथिंबीर मूठ्भर, आले लसूण पेस्ट, कोवळी मेथी चिरुन वाटीभर, तिखट, मीठ
  • ब्राऊन ब्रेड, बटर, पुदीना कोथिंबीर चटणी, केचप

मार्गदर्शन

मूग मिक्सर मधून जाडसर वाटून घ्या.
त्यात मेथी, कोथिंबीर, आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट, तिखट मीठ  टाकून नीट मळून घ्या.
त्याचे चपटे चौकोनी वडे (साधारण ब्रेड स्लाईस च्या आतल्या साईझ चे) करुन तव्यावर शॅलो  फ्राय करून घ्या दोन्ही बाजूने लालसर सोनेरी रंग येइपर्यंत.
ब्रेड चे  स्लाईस तव्यावर कोरडेच भाजून घ्या.
मग खाली ताटलीत घेऊन त्यावर बटर, पुदीना चटणी, कांदा टॉमॅटो काप, काकडीचे दोन काप व वर टिक्की ठेवून वर दुसरी स्लाईस ठेवा.
जरासे दाबून सँडविच मधून तिरके कापा.
सॉस सोबत गरम सर्व्ह करा.


टीपा

सकाळच्या प्रोटीन युक्त नाश्त्याचा पर्याय!
मिक्स कडधान्ये सुद्धा वपरू शकता.........................

माहितीचा स्रोत

स्वतःचे प्रयोग

Post to Feed
Typing help hide