व्यवसायाचे बाह्यांग चांगले असावे

लेख - व्यवसायाचे बाह्यांग चांगले असावे

     दोन हजार साली विसावे शतक संपले. या शतकापर्यंत
कसे दिसता यापेक्षा कसे आहात हे महत्त्वाचे आहे, अशी समजूत होती. तुमचेनाम काय आहे यापेक्षा काम कसे करता, अशी समजूत होती. हे काही प्रमाणात खरे आहे. नव्या शतकात या समजुतीत थोडे बदल होऊ लागलेआहेत. कोणतीही गोष्टकशी आहे याची जाणीव होण्यापूर्वी डोळे ती पाहतात. पहिली प्रतिमा डोळ्यात उमटते.म्हणजेच, नव्या शतकात दिसणे महत्त्वाचे आहे. हे दिसणे छान असेल तर पुढेसंबंधित व्यक्तीला वाव्यवसायाला प्रतिसाद मिळण्याची शक्यता वाढते. व्यवसाय व व्यक्ती बाहेरून चांगला दिसत गेला तर त्याच्या यशातकमीतकमी दहा टक्के वाढ होण्याची शक्यता असते.
     व्यक्तींबाबत उदाहरण घेऊ. एखादा माणूस कामसू आहे पण त्याची दाढीवाढलेली असेल , कपडे खराब असतील तर त्याची किंमत कमी होईल. त्याने जर व्यवस्थितकपडे घातले व दाढी केली तर प्रतिमा उंचावेल.
     व्यवसायाबाबत उदाहरण घेऊ.
एखादीलोकोपयोगी संस्था आहे पण तिथली टेबले, खुर्च्या जुन्या असतील, भिंतींचा रंग गेला असेलतर संस्था चांगली असूनही प्रतिसाद मिळणार नाही. ब-याच हॉटेलची रिसेप्शन एरिया फारचांगली ठेवली असते. कर्मचा-यांना सॉफ्ट स्किल्स शिकवलेली असतात. आकर्षकता वाढवण्याचाहा प्रयत्न असतो. माझ्यामाहितीत एक वडापावचे दुकान आहे. दुकान चालविणा-याने किंमत पूर्वीइतकी कायम ठेवून दुकान प्रशस्त केले. भरपूर प्रकाशदेणारे दिवे लावले. काउंटर स्वच्छ ठेवला. सुटे पैसे हाताशी ठेवले. प्यायला पाणीठेवले. यागोष्टींमुळे बाह्य दर्शन सुंदर झाले. साध्या वडापावलाही ग्लॅमर आले. महत्त्वाचे म्हणजे– वडापाव सेंटर हे नाव दिले. सेंटर या शब्दामुळे प्रतिसादात वाढ झाली.एक अख्खे कुटुंब केवळ वडापाव खाण्याकरता त्या सेंटरमध्ये आल्याचे पाहिले आहे.
      काहीव्यावहारिक उदाहरणे अशी -
     १. पूर्वी अभिनेत्यांचे काम बघणा-या माणसांना
Personal Secretary म्हटलेजायचे. आता Manager म्हटले जाते.
     २.
Cameraman ऐवजी Director of Photography असाबदल झालेला आहे. Librarian याशब्दात फक्त कारकुनी भाव तयार होतो. खरे तर, लायब्ररीयन पूर्ण लायब्ररी मॅनेज करतअसतो. भरपूर कामे करत असतो. म्हणून अलीकडे काही ठिकाणी, Library Manager असा बदल झाला आहे.
    ३.
नोकर चाकर, प्यून हे शब्द बाद होत आहेत. Housekeeping personnel असा शब्द वापरला जात आहे.
    ४. पूर्वी जाहिरात एजन्सीतून क्लाएंटला सांगितले जायचे, आमचा माणूस येईल तुमचाप्रॉब्लेम सोडवायला. आमचा माणूस या शब्दात एक गचाळ भाव आहे. म्हणून कदाचित, Client Service Executive
असा शब्द उपयोगात आला.

     नव्या शतकात नावातील बदल जीवनातप्रतिष्ठा व सुख निर्माण करेल. नावे बदलली तरी शेवटी काम तेच आहे ना, नाव बदलून फायदा नाही, असे एक मत आहे. हे मतही तितके बरोबर नाही कारण कामांचे स्वरुपही बदलतचालले आहे. वर दिलेल्या प्रत्येक उदाहरणात कामांचे स्वरुप अधिक वैविध्ययुक्त होतआहे. म्हणून, बाह्यांग चांगले करणे व व्यवसायाला योग्य ते नाव देणे हे नव्या शतकातसमर्थनीय आहे.

- केदार पाटणकर