सुखकर्ता दुःखहर्ता

सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची
नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची
सर्वांगी सुंदर उटि शेंदूराची
कंठी झळके माळ मुक्ताफळाची ॥१॥


जय देव जय देव जय मंगलमूर्ती
दर्शनमात्रे मनकामनापूर्ती जय देव जय देव ॥धृ॥


रत्नखचितफरा तुज गौरीकुमरा
चंदनाची उटी कुंकुम केशरा
हिरेजडित मुगुट शोभतो बरा
रुणझुणती नूपूरे चरणी घागरिया
जय देव जय देव ॥२॥


जय देव जय देव जय मंगलमूर्ती
दर्शनमात्रे मनकामनापूर्ती जय देव जय देव ॥धृ॥


लंबोदर पीतांबर फणिवरबंधना
सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना
दास रामाचा वाट पाहे सदना
संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवरवंदना
जय देव जय देव ॥३॥


जय देव जय देव जय मंगलमूर्ती
दर्शनमात्रे मनकामनापूर्ती जय देव जय देव ॥धृ॥


- संत रामदास


ह्या आरतीचा अर्थ कोणी नीट समजावून सांगेल का? मुक्ताफळ म्हणजे काय? रत्नखचितफरा? घागरिया? फणिवरबंधना? त्रिनयना?


- सोपा