निवगरी

  • उकडीच्या मोदकांना करतो तशी उकड करणे
  • कोथिंबीर, मिरच्या, जिरे किंवा जिऱ्याची पावडर
  • मीठ
  • उकड मळण्यासाठी तेल,पाणी
१५ मिनिटे
जितकी माणसे तितक्या निवगऱ्या

ही पाककृती सोपी आहे. ज्यांना उकडीचे मोदक करता येतात, त्यांना निवगरी करणे काही अवघड नाही. तांदुळाच्या पीठाची केलेली उकड तेल-पाण्यामधे मळून घेणे. त्यात चवीप्रमाणे मिरच्या वाटून घालणे, चवीप्रमाणे मीठ, चिरलेली कोथिंबीर व जिरे/जिरे पावडर घालुन परत मळून घेउन वड्याच्या गोल आकाराप्रमाणे पातळ थापणे. मोदक जसे वाफेवर उकडतो त्याचप्रमाणे केळीच्या पानावर ठेवून उकडणे. गोड मोदक खाताना मधुन मधुन तिखट निवगरी खायला छानच लागते.

रोहिणी

नाहीत.

सौ आई