मुगाची धिरडी

  • दोन वाट्या हिरवे मूग, , , कोथिंबीर
  • १/२ वाटी उडीद डाळ
  • ९-१० पाकळ्या लसूण, ५-६ हिरव्या मिरच्या
  • मीठ चवीप्रमाणे
  • तेल
१५ मिनिटे
४ जणांना

मुगाची हिरवी धिरडी - (चविष्ट आणि पौष्टिक)

हिरवे मूग व उडीद डाळ रात्री भिजत घालावे.  सकाळी ग्राईंडर मधून बारीक करुन घेतानाच त्यात लसूण, मिरची, कोथिंबीर ही वाटून घ्यावे.  कोथिंबीरीऐवजी पुदिना किंवा पालक ही वापरता येतो.  सरसरीत मिश्रण करावे.  चवीप्रमाणे मीठ घालावे.  तव्यावर थोडेसे तेल टाकून धिरडी करावीत.  साध्या तव्यावरही चिकटत नाहीत.  छान हिरव्या रंगाची धिरडी तयार होतात.  शेंगदाण्याच्या दह्यात कालवलेल्या चटणीसोबत छान लागतात.

नाहीत.

एक मैत्रिण