काही मनातले...

कधी कधी मी जीवनाचा विचार करतो, तेंव्हा काही क्षण मला अस्वस्थ करीत असतात. अर्थातच हे क्षण / आठवनी या मृत्यू शी निगडीत आहेत.


१. मी जलगांव मधे शिकत होतो. ( १९८३ चे वर्ष ) आठवते.. माझा एक वर्गमित्र होत, आई-वडीलांचा एकूलता मूलगा असल्यामुळे लाडका होता. आई-वडीलांनी प्रेमाने त्यालाअ बुलेट गाडी घेवून दिली. अतिशय भरघावपणे तो गाडी चालवायचा. एकदा अशाच वेगांने गाडी चालवताना त्याचा अपघात झाला आणि त्याचा जागच्या जागी मृत्यू झाला.


२. आम्ही महाविद्यालयात सर्व मित्र गरीब परिस्तितीतून आलेल्या मुलांचा भरणा ज्यास्त होता. त्यामधे १ मित्र होता, लहानपणी आई ने अतिशय गरीबी मधे अक्षरशा मोलमजुरी करुन त्याला मोठे केले, शिक्षण दिले.


ईंजिनीयरींग झाल्यानन्तर तो सुरवातीला आपल्या गावाम्मधे शिकवण्या घेत असे, अनेक मुले-मुली येत होते, दुर्दैवाने, तो त्यातील एका मुलीच्या प्रेमात पडला. अर्थातच ही गोष्ट तिच्या घरच्यांना मान्य होणे अशक्यच होते, त्यानी त्याला मारहाण केली. ही गोष्ट त्याच्या मनाला लागली, आणि त्याने आत्महत्या केली.


३. आता आता म्हणजे २ वर्षापुर्वी माझा १ मित्र सुमो गाडीतुन जात असतांना त्याच्या गाडी ला अपघात झाला आणि तो तडकाफडकी तो मरण पावला. मृत्यू समयी त्याचे मागे पत्नी गरोदर होती. त्याच्या वडीलानी दोनच वर्षापुर्वी स्वेच्छेने सेवानीवृती घेतली होती. त्यानां या दुर्दैवी प्रकारामुळे परत एकदा संसाराची जबाबदारि घ्यावी लागली.


या सर्व घटनांचा माझ्यावर बराच परीणाम झाला. जीवनाची अपरीहार्यता, दैवाची गती, आणि माणसाची परावशता.


कोणत्याही कारणाने का असेना, एका क्षणात जीवन होत्याचे नव्हते होवुन जाते.


या सर्व मित्रांचे आई-वडीलांच्या दुखाःच्या कल्पनेने मी अस्वस्थ होतो.