प्लेन ग्रेव्ही

  • कांदे ६
  • टोमॅटो ३
  • आलं-लसूण पेस्ट १ टेबलस्पून
  • काश्मिरी तिखट १ टेबलस्पून
  • हळद १/२ टी स्पून
  • गरम मसाला १ टी स्पून
  • कसूरी मेथी पावडर १ टी स्पून
  • तेल १/२ वाटी
  • मीठ चवीनुसार
  • कोथिंबीर २ टेबल स्पून
४५ मिनिटे
४-६ जणांसाठी

कांदे लांब आणि पातळ चिरून घ्या. असे चिरलेले कांदे लालसर रंगावर तळून घ्या. एका रोळीत काढून तेल निथळू द्या. थंड झाले की मिक्सर मधून, कमीत कमी पाणी वापरून, वाटून घ्या.

टोमॅटो बारीक चिरून घ्या.
अर्धी वाटी तेल गरम करून त्यात वाटलेला कांदा टाकून परता. किंचित परतल्यावर त्यावर बारीक चिरलेला टोमॅटो टाका. त्यावर चवीनुसार मीठ घालून परता. आता, आलं-लसूण पेस्ट, काश्मिरी तिखट आणि हळद घालून परता. गॅस अगदी बारीक ठेवा. टोमॅटोला पाणी सुटेल. परतत राहा. ग्रेव्हीतले पाणी आटून तेल सुटू लागले की त्यावर कसूरी मेथी पावडर घालून जरा परता. किंचित (अर्धी वाटी) पाणी घालून ग्रेव्ही सारखी करून घ्या. गॅस बंद करून ग्रेव्ही काचेच्या वाडग्यात काढून वरून कोथिंबीर टाकून सजवा.

शुभेच्छा...!

ही ग्रेव्ही पुलावा बरोबर (आवश्यकता भासल्यास) घेतात.

तेला ऐवजी वनस्पती घी वापरले तरी चालते पण मग ग्रेव्ही जरा दाटसरच ठेवावी, जास्त पातळ करू नये.

सर्व घटक पदार्थ आवडीनुसार कमी-जास्त करण्यास हरकत नाही.

चिकित्सक वृत्ती आणि अनुभव.