गाजराचे पराठे

  • २-३ गाजर किसून
  • २ वाट्या कणीक
  • १ टेबलस्पून डाळीचे पीठ
  • ४-५ हिरव्या मिरच्या, आले लसूण वाटून
  • १ टेबलस्पून जिरे किंवा धने-जिरे पावडर किंवा चिमूट्भर ओवा
  • मीठ चवीनुसार
३० मिनिटे
दोन जणांना. या प्रमाणात साधारण आकाराचे ७-८ पराठे होतात.

कृतीः

किसलेले गाजर, कणीक, वाटण, मीठ असे सगळे जिन्नस एकत्र करावेत. पोळ्यांची कणिक ज्याप्रमाणे भिजवतो तशीच पण किंचितशी घट्ट भिजवावी.

१०-१५ मि. कणिक झाकून ठेवावी.  मध्यम आकाराचा उंडा घेऊन गोल पराठे लाटावेत. दोन्ही बाजूने तेल सोडून तपकिरी भाजावेत.

गाजराच्या पराठयांबरोबर दही किंवा लोणचे छान लागते. 

हे पराठे रूचकर लागतात. दिसतात पण सुरेख़ व झटपट होतात. आणि शिवाय पौश्टिक ही आहेत. गाजराच्या एवजी दुधी किंवा मुळा वापरून पण असे पराठे करता येतात. फ़क्त दुधीचे पाणी पिळून काढून टाकावे. नाहीतर लाट्ता येत नाहीत.

ज्यांना याच्या भाज्या आवड्त नाहीत त्यांच्यासाठी असे पराठे उपयुक्त आहेत.