हैदराबादी पुलाव

  • ३ वाट्या शिजवून घेतलेला मोकळा भात
  • १ वाटी बारीक चिरलेला कांदा
  • अर्धी वाटी मटार
  • अर्धी वाटी बारीक चिरलेला टोमॅटो
  • १ टी. स्पून उडीद डाळ
  • १ टी. स्पून किसलेलं आलं, कढीपत्ता
  • ३-४ सुक्या लाल मिरच्या
  • अर्धी वाटी खोवलेले ओले खोबरे
  • चवीपुरती साखर, मीठ
  • १ लिंबाचा रस
  • कोथिंबीर
  • फ़ोडणीसाठी तेल, हिंग, जिरे
१५ मिनिटे
४-५ जणांना

कृती

पहिल्यांदा तेल तापवून जिरे व हिंग घाला.

त्यानंतर उडीदडाळ घालून तांबूस रंग येईपर्यंत परता.

नंतर त्यात कांदा, मटार, आलं, सुक्या मिरच्या तुकडे करून, कढीपत्ता, टोमॅटो हे सर्व घालून परता.

कांदा व मटार शिजला की त्यात मोकळा भात, ओले खोबरे, साखर, मीठ व लिंबाचा रस घालून परतून एक वाफ येऊ द्यावी. वरून कोथिंबीर पेरावी.

शिळा भात खूप उरल्यास त्याचा असा पुलाव करावा.

तेलाएवजी तुपात केल्यास चविष्ट लागतो आणि बघताबघता संपून जातो.