ताकातला पालक

  • पालकाची मध्यम जुडी १
  • १ मिरची, अर्धा चमचा लाल तिखट,
  • साखर अर्धा चमचा, मीठ, तेल
  • १-२ चमचे डाळीचे पीठ
  • २-४ चमचे दाण्याचे कूट
  • आंबट आणि दाट ताक १ वाटी
३० मिनिटे
२ जणांना

पालक चिरुन पाण्यातून धुवुन घेउन रोवळीमधे ठेवणे. रोवळीतून पाणी निथळून गेले की तो पालक कूकरमधे एका भांड्यात शिजवून घेणे. पालक शिजवल्यावर त्यात डाळीचे पीठ घालून डावेने घोटून घेणे. डाळीच्या पीठाच्या गुठळ्या होता कामा नयेत. नंतर त्यात दाण्याचे कूट, आंबट व दाट ताक, लाल तिखट, साखर व चवीप्रमाणे मीठ घालून ढवळणे. कढल्यात तेलाची फोडणी करुन त्यात एका मिरचीचे उभे चार काप चिरुन घालणे. नंतर ही तेलाची फोडणी भाजीत घालून थोडेसे पाणी घालून मंद गॅसवर  उकळी येस्तपर्यंत गरम करणे.

अशाच प्रकारे ताकातली मेथी पण छान लागते.

रोहिणी

 

नाहीत.

सौ आई