मेथीचे लाडु

  • १/२ कि. मेथी,१/२ कि. करमरीत गव्हाचे पिठ,डिंक २५० ग्रम
  • १ कि. शेंगदाणा तेल,१ १/२ कि. गूळ,
  • १/२ किलो खोबरं
  • १/२ ख़ारिक
  • १२५ ग्रॅम गोडंबी
  • काजु,बदाम आपल्या आवडी प्रमाणे
३० मिनिटे
५ जणांसाठी

प्रथम मेथी भाजुन घेणे. ती दळुण आणणे. मिक्सर वर दळली तरी चालेल. १/२ कि. गहु करमरीत  दळुण  आणणे. नंतर मेथीच्या पिठाला रात्री थोडे दुध लावुन ठेवणे.Next day डिंक तळुण घेणे.

नंतर तेलात गव्हाचे पिठ खमंग भाजुन घेऊन परातित टाकणे.

नंतर दुध लावलेले मेथीचे पिठ न भाजता गव्हाच्या पिठात कालवणे.

तेल गरम करावयास ठेवणे.त्यात गुळ बारीक करुन टाकणे. नंतर ते पिठवर ओतणे व चांगले कालवुन घेणे.त्यात खोबरे किसुन ,भाजुन कालवणे.खारिक,बदाम,काजु, बारीक करुन टाकणे. डिंक तळुन आणि कुटुन टाकणे.  नंतर गोल गोल लाडु बनवणे.

हे लाडु अतिशय सुंदर लागतात.

सौ . रुपाली रोकडे

यात तेलाऐवजी साजुक तुपहि वापरु शकतात .

माझी आई (सौ . विमल साळी)