आम्ही शाकाहारी ???

विषय तसा थोडासा संवेदनशील आहे,पण तरीही चर्चेत आणावासा वाटतो ...


माझे बरेचसे मित्र (त्यांच्या मते ) शाकाहारी आहेत ,अशाच माझ्या एका मित्राबरोबर माझा झालेला संवाद....


मी - काय रे तु चिकन वगैरे खात नाहीस ??


तो- नाही..


मी - का ??


तो - अरे ,प्राण्यांना मारुन खाण कितपत बरोबर आहे,त्यांना मारताना होणा-या वेदना जरी मला आठवल्यातरी मला त्रास होतो ,आपल्या जिभेच्या चवीसाठी कुणाचा जीव घेण चुकीच आहे...तुला नाही वाटत??


मी--........... हो ,वाटत ना ...पण बघ, तु जेंव्हा पालक ,मेथी अशा भाज्या खातोस ,आणि शेतकरी जेंव्हा अशा पालेभाज्या जेंव्हा जमिनीतुन उखडतो तेंव्हा त्यांच्यामध्ये काय जीव नसतो, त्यांना नसतील होत वेदना ?? निसर्गाने त्यांना प्राण्यांप्रमाणे भावना व्यक्त करायला आवाज नसेल दिला ,प्राण्यांप्रमाणे नाही त्यांच्या अंगात रक्त...पण आपण घेतो तो शेवटी एक जीवच ना ??? आपल्या पुर्वजांनी म्हटलेलंच आहे "जीवो जीवस्य जीवनम " ,म्हणजेच एक जीव हा दुस-या जीवाचे जीवन आहे !! मग तो जीव एका प्राण्याचा असो वा आणि कुणाचा ,काय फ़रक आहे ...


( माझ्या मित्राकडे ह्या प्रश्नाचं उत्तर नव्हत ,पण मला ते हवय ,विशेषतः शाकाहारी असणा-यांकडुन ... सद्सदविवेक बुद्धीला पटणारं... मग देताय का ? )


टीप - ह्या लेखाचा हेतु मांसाहाराला प्रोत्साहन देण हा अजिबात नाही.मला निव्वळ चर्चा करायचीय. माझ स्वताच मत बदलायला पण मला आवडेल ...