१. फूलकोबीची मोठी मोठी फुले कापावीत. २. फुलांना चवीनुसार/आवडीनुसार मीठ, तिखट व चाट मसाला नीट लावावा. ३. शेकोटीत भाजत असल्यास पूर्ण फुले एक एक करुन ऍल्युमिनीयम फॉइल मधे पूर्ण व्यवस्थित गुंडाळावीत ४. शेकोटीत भाजत असल्यास या गुंडाळलेल्या ऍल्युमिनीयम फॉइल वर ओल्या मातीचा १ मीमी जाडीचा थर द्यावा व शेकोटीत खरपूस भाजावे. ५. घरीच साध्या कढईत तळत असल्यास ३ चमचे कॉर्नफ्लॉवर मधे पातळ होईल इतपत पाणी व मीठ घालावे व त्यात सर्व फुले व्यवस्थित घोळवून फिकट तपकिरी रंगावर तळावी. फुलांच्या देठाला चंदेरी फॉइल गुंडाळून गरम गरम वाढावी.
छान शनिवारच्या रात्री/दुसऱ्या दिवशी सुट्टी असेल अशा रात्री शेकोटीपाशी आपला कंपू, भुताच्या गोष्टी, आणि बरोबर ही खमंग फुलकोबी आणि असल्यास भाजलेले बटाटे. अप्रतिम. अशा रात्री वेळ कसा जातो कळतच नाही. आणि हॉटेल मधे खाण्याच्या आधी 'व्हेज लॉलीपॉप' या आंग्ल नावात गुंडाळून येणारी चंदेरी विजारी घातलेली फुलकोबीतील फुले तर आपल्या माहितीची असतीलच. फ्लॉवरची भाजी न आवडणारे बरेच जणही ही खमंग फुले आवडीने खाताना आढळले आहेत.
हॉटेले व अशीच एक शेकोटी बैठक
निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरण
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.