याडणी (कानडी पदार्थ)

  • १/२ वाटी हिरवे मूग
  • १/२ वाटी चवळी, १/२ वाटी ऊडिद डाळ.
  • १/२ वाटी तांदूळ.
  • १/२ वाटी हरभरा डाळ, १/२ वाटी तूरडाळ
  • कांदा (बारीक चिरलेला), कोथिंबीर
  • आलं, मीठ, मिरची, तेल.
१५ मिनिटे
२ जणांसाठी

याडणी करायच्या आधी मूग, चवळी, तांदूळ, उडिद डाळ, हरभरा डाळ आणि  तूरडाळ १०/१२ तास भिजत घालावे.
मग वरील भिजवलेलं साहित्य, मिरची आणि आलं मिक्सर मधून सरबरीत वाटून घ्यावे.
आता त्यात बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर आणि चवीप्रमाणे मीठ घालून पीठ सारखे करावे.
घावन घालतो तसे तव्यावर घालावे.बाजूने तेल सोडावे.

                               

 

 

याडणी जाडसरच चांगली लागते. वाढ्ताना चटणी किंवा लोण्याबरोबर खायला द्यावे. 

सासूबाई