मन जाहले..(गझल)

मन जाहले शहाणे
तन राहिले दिवाणे


मन पंढरीस जाते
तनु शोधते बहाणे


कानी अभंग,दोहे
देही खुळे तराणे


चित्तात उपरती,पण
गात्री रती उधाणे


त्यज आरसा,उरु दे
रुप सावळे पहाणे



(जयन्ता५२)