मी मुक्तांमधला मुक्त ...

ही कविता 'लोककवी मनमोहन' यांची असावी
पण स्वातंत्र्यवीर सावरकरांचाच संदर्भ असावा ....


मी मुक्तांमधला मुक्त, तू कैद्यांमधला कैदी ।
तुझे नि माझे व्हावे, ते सुर कसे संवादी ॥ धृ ॥


माझ्यावर लिहिती गीते, या मंद समीरण लहरी ।
माझ्यावर चित्रीत होते, गरुडाची गर्द भरारी ॥
जड लंगर तुझिया पायी, तू पीस कसा होणार? ।
माझ्याहून आहे योग्य, भूमीला प्रश्न विचार! ॥  १ ॥


आभाळ म्हणाले नाही, भूमीही म्हणाली नाही ।
विनायकाने मग त्यांची, आळवणी केली नाही ॥
पापण्यांत जळाली लंका, लाह्यांपरी आसू झाले ।
उच्चारून होण्याआधी, उच्चाटन शब्दा आले ॥ २ ॥


दगडाची पार्थिव भींत, तो पुढे अकल्पित सरली ।
मी कागद झाले आहे, चल लिही पुढे ती वदली ॥