काजुकतली

  • १ वाटी काजुचा बरीक कूट
  • १/२ वाटी साखर
  • १ चमचा मीठविरहित बटर
  • १ चमचा पाणी
३० मिनिटे
२ ते ३ व्यक्ती

साखर पाण्यात भिजवायची व गॅस वर उकळायचे. २ तारी पाक करायचा. त्यात बटर घालायचे. नंतर काजुचा कूट घालायचा. मंद आचेवर ठेवायचे. बुडबुडे यायला लागतात. कड सुटायला लागली की गॅसवरुन कढायचे. ताटाला तुपाचा हात लावुन त्यावर वड्या थापायच्या.

झाली काजुकतली तय्यार !!!!

१. मीठविरहित बटर नसल्यास लोणी अथवा तुप वापरले तरी चालते.

२. २ तारी पाक ओळखण्यासाठी - एक थेंब पाक ताटलीवर टाकायचा आणि बोट न भाजु देता चिमटीत पकडायचा. चिमुट सोडल्यावर जर २ तारा आल्या तर पाक तयार झाला असे समजावे.

३. शंकरपाळीच्या आकारात वड्या कापाव्यात.

एक मैत्रिण