फेब्रुवारी २२ २००६

मेथी-मटर-मलई

जिन्नस

  • ३०० ग्रॅम निवडलेली कोवळी मेथी-(दोन मध्यम जुड्या).
  • अर्धा कप ताजी साय (मलई).
  • एक वाटी ताजे मटारचे दाणे.
  • एक मोठा कांदा बारीक कापून.
  • आलं- १इंच, लसुण पाकळ्या ८ ते १०.
  • पळीभर तेल, आमचूर व तिखट पावडर, किंचीत गोडा मसाला, चवीला मीठ.

मार्गदर्शन

-आले लसूण मिक्सर मधून फिरवून घेणे.
-कढईत किंवा फ्राय पॅन मध्ये तेल तापत ठेवावे.
-दुसऱ्या चुलीवर एका भांड्यात पाणी उकळवत ठेवावे.
-तेल चांगले कडकडीत तापल्यावर थोडी मोहरी, जिरे व गोडा मसाला ह्याची नांवा/चवीपुरता फोडणी  करावी. तिखट टाकू नये.  
-त्यावर कांदा चांगला लाल होईपर्यंत परतून घ्यावा.
-उकळलेल्या पाण्यात मेथी टाकून लागलीच थंड पाण्यात बुडवावी ह्याने मेथीचा हिरवा रंग भाजी करताना कायम टिकतो व मेथी शिजताना कडक होत नाही.
-कांदा परतल्यावर त्यात आले लसूण व मटारचे दाणे घालून परत थोडे परतावे.
-त्यावर मेथी टाकून परत दोन मिनिटे परतावे. (तळटीप पाहा)
-त्यात लाल मिरची पावडर टाकून चांगले (४/५ मिनिटे) शिजू द्यावे.
-शिजल्यावर आमचूर पावडर व मीठ टाकून एकजीव करावे.
-दोन/तीन मिनिटे चुलीवर ठेवून सर्वात शेवटी मलई टाकावी.
-एक मिनिटे वाट बघून मलई जरा गरम झाल्यासारखी वाटल्यावर लगेच चुलीवरून उतरवावी.
-ढवळू नये.  जेवायला बसताना ढवळावी.

गरम गरम पोळ्यांबरोबर वाढावी.

टीपा

-मेथी शिजायला टाकल्यावर त्यात किंचीत लिंबू पिळल्यास रंग पक्का/कायम राहातो, मग आमचूर पावडर टाकू नये.
-मटार ऐवजी बेबी कॉर्न किंवा मक्याचे दाण्यांचीही भाजी छान लागते.
-मक्याच्या दाण्यांसोबत ही भाजी करताना मक्याचे दाणे उकडवून घ्यावेत.
-मेथी ऐवजी पालक मटर मलई पण करता येते, ह्या भाजीच्या कृतीत मेथी गरम पाण्यात बुडवली तसे करायची गरज नाही (पण पालक बारीक चिरून घ्यावा)कारण पालकाची पाने मुळतः मऊ असतात.
-मेथीची कुठल्याही प्रकारची भाजी बनवण्यापूर्वी ती गरम पाण्यातून काढल्यास शिजवताना कडक होत नाही. 
-शुभेच्छा !

माहितीचा स्रोत

सौ.चा माझ्यावर प्रयोग-

Post to Feedझकास
तोंडाला पाणी सुटले.
उत्तम

Typing help hide