वांगी पोहे

  • २ वाटी पोहे, १ चमचा तिखट, २ छोटी वांगी, मीठ, साखर, थोडीशी चिंच, थोडा
  • गोडा मसाला.
  • खोबरे, कोथिंबीर, शेव
१५ मिनिटे
चार माणसे

पोहे धुवून घेणे. वांगी पातळ चिरुन घेणे. कढईत फोडणीत हिंग,मोहरी, कढीपत्ता, हळद घालून मग वांगी घालणे. वाफ आल्यावर पोहे व सर्व जिन्नस घालणे. चिंचेचे पाणी कोळून घालणे. पाच मिनीटे मंद आंचेवर वाफ द्यावी. गरम पोह्यावर खोबरे,कोथिंबीर घालुन खाणे. आवडत असल्यास बारीक शेव वरुन पेरणे.

नाहीत.

घरातील पध्दत. खूप खमंग लागतात.