चल रे भोपळ्या टुणुक टुणुक

घरी गेले होते तेव्हा माझा भाचा,समीर याने पुढील कविता मला ऐकवली.

जंगलाच्या झाडीत वाघोबा लपले
म्हातारीला पाहून खुदकन् हसले
"थांब थांब म्हातारे कुठे चालली?
खाऊ दे तुजला, भूक फार लागली."
"थांब थांब वाघोबा, लेकीकडे जाऊ दे
लेकीचे लाडूपेढे मला खाऊ दे."
दोनचार दिवसांनी गंमत झाली
भोपळ्यात बसून म्हातारी आली
वाघोबाने भोपळा मध्येच अडविला
भोपळ्याच्या आतून आवाज आला,
"कशाची म्हातारी? कशाची कोतारी?
चल रे भोपळ्या टुणुक टुणुक !"

'चल रे भोपळ्या टुणुक टुणुक' ही कथा माहिती असल्याने ह्या कवितेत काही भाग गळपटला असल्यासारखं वाटत आहे. दुकानातून मिळालेल्या लहानग्यांसाठीच्या एका चकतीतून हे गाणे त्याने ऐकलेले आणि पूर्ण पाठ करून मला ऐकवलेले, त्यामुळे माझा गोंधळ आणखीनच वाढला. हे गाणे एवढेच आहे की मौखिक हस्तांतरणामुळे यातील काही ओळी गळपटल्या आहेत? यातील गळपटलेल्या ओळी कोणास माहिती असल्यास आणि कवी/कवयित्री माहित असल्यास सांगावे, ही विनंती.