निराशो भर्तृहरिः ।

नमस्कार, संस्कृतप्रेमींनो,


बऱ्याच मनोगतीयांच्या इच्छेनुसार हा एक भर्तृहरिचा श्लोक आपणासाठी ....


यां चिन्तयामि सततं मयि सा विरक्ता, 


सा अपि अन्यम् इच्छन्ति जनं स जनोऽन्यसक्तः ।


अस्मद्कृते तु परितुष्यते काचिद् अन्या,


धिक् तां च मदनं च इमां च मां च ॥ .... भर्तृहरिः


"मी जिचे सतत चिन्तन करतो, आणि जी माझ्यावरच प्रेम करते (असे मी समजतो); ती मात्र अन्य कुणावर तरी लुब्ध आहे. (आणि दुर्दैवाची गोष्ट अशी की ज्यावर ती लुब्ध आहे) तो मात्र तिसऱ्याच कुणावर तरी प्रेम करतो.


(पण यात सुदैवाची गोष्ट अशी की) या सर्वांहून निराळेच कुणीतरी माझ्यावर प्रेम करते ( पण हे मात्र मला माहित नाही.)


अशा या बेभरवश्याच्या मदनाचा, त्याचा, तिचा आणि त्याचाही धिक्कार असो !!!!"


... आपला मदनधिक्कारीत ... नीलेश कुलकर्णी