अय्या हे शब्द कुठून आले?

चला शब्द चघळू आणि हे शब्द कुठून आले पासून पुढे जाऊ या.

कालच संस्कृत शब्दकोशात अये हा शब्द वाचला. त्याचा अर्थ अरे किंवा आश्चर्याने कलेले संबोधन असा काहीसा होता.

तर या शब्दावरूनच अय्या हा मराठी शब्द आला असावा असे वाटते. अरे हा शब्ददेखील अयेचा अपभ्रंश असावा.

तसेच वाट हा अगदी तत्सम शब्द आहे, हे देखील मला कालच कळाले.