कटलेट (भाज्यांचे)

  • २ बटाटे (ऊकडलेले) , १ गाजर (किसलेले), १ बीट (कीसलेले)
  • २ मिरच्या (बारीक चिरलेल्या), १ वाटी मटार (वाफ़वलेले), १/२ वाटी ब्रेडचा चुरा
  • आलं-लसुण (बारीक चिरलेले), मीठ, तिखट.
३० मिनिटे
२ जणांसाठी

ऊकडलेला बटाटा, गाजर, बीट, मिरची, मिठ,तिखट, मटार, आलं लसुण आणि ब्रेडचा चुरा एका पातेल्यात एकत्र करुन मळून घ्यावे.

हव्या त्या आकाराचे कटलेट हातावर बनवून घेणे आणि फ़्राईंग पॅन मधे थोड्याश्या तेलावर दोन्हीबाजूने खमंग तळणे.

टॉमेटो सॉस अथवा हिरवी चटणी बरोबर खावे.तसेच पावात घालुनही छान लागते.

कटलेट मधे मटार न वापरता भिजवून शिजवलेले हिरवे वाटाणे वापरले तर जास्त छान लागतात.

आवडत असल्यास इतर भाज्या जसे- कोबी, फ़्लॉवर इ.घालाव्यात.

बीट ऊकडवून न किसता कच्चेच किसावे.

उत्तम चवीसाठी आलं-लसुण भरपूर वापरावे. 

आई