सोजी हलवा

  • दूध-१/२ लिटऱ
  • साखर-१ वाटी
  • गव्हाचा जाडा रवा (सोजी)-पाऊण वाटी
  • काजू-पिस्त्याचे तुकडे
  • वेलची-जायफ़ळ पूड
  • २ चमचे तूप
३० मिनिटे
२-३

तुपावर रवा किंचित भाजून वरून दूध घालावे.

शक्यतो न चिकटणाऱ्या भांड्यात करावे.

उकळी आल्यावर साखर घालावी.

किंचित पातळ असतानाच भांडे उतरवावे. आपोआप आटतो हलवा.

उतरवल्यावर काजू, वेलची घालावे.

 

पौष्टिक खाऊ!

साखरेसोबत थोडा गूळही चांगला लागतो. पण उतरवल्यावर घालावा, नाहीतर दूध नासण्याची भिती असते.(मनीमाऊला नही आवडत दूध नासलेले!!)

 

 

 

मनीमाउची आई