उन्हाळे - पावसाळे पाहतात , मग हिवाळे का नाही ?

लोक, विशेषतः जुने लोक, स्वतःबद्दल बोलताना 'आम्ही इतके इतके उन्हाळे- पावसाळे पाहिले आहेत' असे म्हणतात. पण या वाक्प्रचारात उन्हाळ्या- पावसाळ्यांबरोबर हिवाळ्याचा समावेश का केला जात नाही ? उन्हाळा वा पावसाळा या ऋतूंमध्ये व हिवाळा या ऋतूमध्ये असा पक्षपात  का केला जातो ?