मे ११ २००६

उलटसुलट केले काळज़ाला ज़रासे

उलटसुलट केले काळज़ाला ज़रासे
परत डिवचले मी वादळाला ज़रासे

हसत अवस माझी काढते रोज़ खोडी
सतत लपवते ती चांदण्याला ज़रासे

चलबिचल कशाला होतसे पापण्यांची?
भिडव सरळ डोळे पावसाला ज़रासे

"सहज़ बघ विसरलो, लीलया, मी तुलाही!"
(अज़ुन फ़सवतो मी या मनाला ज़रासे)

विसर पडत जातो पांगणाऱ्या उन्हाचा
फ़िरुन मळभ येते आसऱ्याला ज़रासे

Post to Feed

छान
वाहवा
छान
हेच
ब्राव्हो!
सुंदर
मनाला भिडणारे
बहोत दिनोके बाद
अर्थ
वा! व्वा!!
ः)
मला पटली!
कमीजास्त
सहमत
छान
छान गझल
सुंदर
सुंदर
"सहज़ बघ विसरलो, लीलया, मी
हेच!
छान
वा!
सहमत
वा!
आभार
श्रीयुत चिटणीस
वा! चक्रपाणिराव!
वदनि कवळ घेता
वृत्त
सहमत
पुरवणी
छान...
छान
उलटसुलट
सुंदर
सुरेख!

Typing help hide