'मनोगत'कारांचे अभिनंदन

अलीकडेच आयोजित करण्यात आलेल्या मराठी संकेतस्थळांच्या पहिल्या खुल्या स्पर्धेचे निकाल जाहीर झाले असून 'मनोगत ' ह्या आमच्या संकेस्थळाने द्वितीय पारितोषिक मिळवला आहे, अशी बातमी आज दैनिक लोकसत्तात वाचली आणि एक मनोगती म्हणून अत्यंत आनंद झाला. 


पहिले पारितोषिक आकाशवेध ह्या खगोलशास्त्राला वाहिलेल्या संकेतस्थळाला मिळाले आहे. आजच भेट दिली. फ़ाँटच्या समस्येमुळे अभ्यास करू शकलो नाही. पण वावर(नेविगेशन), सदस्यसंख्या, सदस्यांचा सहभाग, कंटेट, तंत्रज्ञान आणि मराठीच्या वापरावर जोर हे निकष लावले असल्यास 'मनोगत'लाच निर्विवादपणे प्रथम पारितोषिक मिळायला हवे होता.


'मनोगत'कार महेश वेलणकर ह्यांचे हार्दिक अभिनंदन! पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.


चित्तरंजन