माध्यमिक मनोगती -२

प्रिय मनोगतींनो,


अनेकानेक मनोगतींचे मनोगतावर प्रकाशित झालेले लिखाण प्रसिद्धीमाध्यमांतही प्रकाशित होत आहे.  - माध्यमिक मनोगती


पूर्वी ह्या विषयावर इथे झालेल्या चर्चेला  प्रेरणा स्रोत धरून एक कल्पना मांडू इच्छीत आहे.


जर एखादा मनोगती दुसऱ्या (लेखक) मनोगतीचे लिखाण आपल्या शहरातल्या प्रसिद्धिमाध्यमात प्रकाशित करू इच्छितो (ढापायचे नाही हो! ह्यासाठी लेखक सदस्याचे मनोगतावरील नाव वापरूनच) तर त्याला लेखक मनोगतीची परवानगी / संमती असेल काय?


(ह्याचा उद्देश्य अशा मराठी बांधवांपर्यंत आपले लेख पोहोचविण्याचा प्रयत्न राहील ज्यांचा माहिती महाजाळावर वावर नाही. एकापरीने मनोगताबद्दल प्रचार पण होईल आणि काही नवे मनोगती आम्हाला मिळतील ही ???)


ह्यावर सुज्ञ मनोगतींचे काय मत आहे ....


(होऊ द्या की एक जोरदार चर्चा)


आपलाच (प्रचारक) भोपाळी भाऊ