मनोगतचे आणि महेशरावांचे हार्दिक अभिनंदन

मनोगतचे आणि महेशरावांचे हार्दिक अभिनंदन.


"दिशा" पासून  (किंवा त्याअगोदरही) महाजालावर तुम्ही मराठी साठी नवनवीन प्रयोग केलेत. आता मनोगतच्या रुपात मराठी संकेतस्थळ नुसते समृद्धच नाही तर किती  सुंदर  करता येते हे दाखवून दिलेत. आणि आता तुमच्या कष्टांची दखल शासनाकडूनही घेतली गेली आहे.


तुमच्या भावी उपक्रमांना आणि मनोगताला असेच किंवा याहून अधिक यश मिळो ही सदिच्छा !