बेसन लाडू

  • हरबरा डाळीचे पीठ १ वाटी
  • पीठीसाखर १ वाटी
  • साजूक तूप ६-७ चमचे (पातळ)
१५ मिनिटे
२ जणांना

हरबरा डाळीचे पीठ व साजूक तूप कढईत एकाच वेळी घालून मध्यम आचेवर तांबूस रंग येईपर्यंत भाजून घेणे. सतत ढवळत राहणे नाहीतर पीठ करपेल. भाजून झाल्यावर गॅस बंद करणे. नंतर लगेच त्यात १ वाटी साखर घालून परत हे मिश्रण ढवळून एकसारखे करणे. खूप गार झाल्यावर लाडू वळणे.

ज्यांना कमी गोड आवडते त्यांनी पाउण वाटी साखर घालावी. लाडवामध्ये वेलची पूड किंवा बेदाणे आवडत असल्यास घालणे. नाही घातले तरी चालते.

तूपाचे प्रमाण वर दिल्याप्रमाणेच घालावे. पण डाळीचे पीठ पूर्णपणे तूपामध्ये भिजायला हवे, त्याप्रमाणे तूपाचे प्रमाण कमी जास्त करावे. तूप थोडे जास्त झाले तरी चालेल पण कमी नको. १ वाटी डाळीच्या पीठाचे छोटे छोटे आठ लाडू होतात.

रोहिणी

बरेच दिवस टिकतात. साजूक तुपातले चवीला जास्त चांगले लागतात. 

सौ आई