मे २४ २००६

किस्से ओकारीचे

ओकारी ह्या शब्दाइतका शक्तिवान शब्द दुसरा नाही. नुसता उच्चारला तरी त्या शब्दाशी संबंधित सर्व गोष्टी समोर उभ्या राहतात, पोटात ढवळायला लागते.


आयुष्यात प्रत्येकाच्या समोर कधी-ना-कधी कोण ना कोणतरी ओकलेले असतेच.
असेच काही किस्से आपण इथे व्यक्त करूयात.

माझ्याकडून काही ओकारीमय किस्से ;-

१. पुण्यातील जोशी-वडेवाले तर सगळ्यांना माहीत असतीलच. एकदा कोथरूड मधील जोशी-वडेवाल्यांकडे मित्रांसमवेत मी गरमा-गरम वडापावचा आस्वाद घेत होतो. त्याच्याशेजारीच एक देशी दारूचे दुकान आहे. तेथून एक मद्यपी नारिंगी ढोसून हेलपांडत वडेवाल्याकडे आला.

केस पिंजारलेले, शर्टांची बाटणं उघडी, डोळे तारवटलेले. त्याने एक वडापाव घेतला आणि एका झाडाच्या पारावर तो वडापाव चघळत बसला.

थोड्याच वेळात त्याला काहीतरी झाले, त्याचा चेहरा पिळवटला गेला आणि तोंडातून ओकारीचा एक फवारा बाहेर उडाला. दोन मिनिट तो भांबावून आपल्या ओकारीकडे पाहत राहिला आणि नंतर परत २-३ दा जोर-जोरात ओकला. काही मिनिटांतच समोरची जमीन पिवळ्या-हिरव्या ओकारीने भरून गेली. त्याने नुकतेच खाल्लेले वड्यातील बटाटे, ब्रेड चे तुकडे त्यावर तरंगत होते. थोड्याच वेळात त्यावर माश्या घोंगावु लागल्या.

तो बेवडा डोके धरून बसून होता. त्याच्या तोंडाला, दाढीला ओकारीच्या तारा लटकत होत्या. मग थोड्यावेळाने उठला. त्या ओकारीपाशी गेला. त्यातील बटाटे उचलले, आपल्या लेंग्याला पुसले, आणि पुन्हा त्या वड्यात ते बटाटे भरून तो वडापाव खात-खात तेथून निघून गेला.

२. मुंबईला येतानाचा किस्सा.
कल्याण स्टेशन ला रेल्वे थांबली होती. प्लॅटफॉर्मवर एक म्हातारी बाई जोर जोरात खोकत होती. तिला जोरात ढास लागली होती.  तोंडावर हात ठेवून खोकता खोकता तिला एकदम ओकारी झाली आणी नेमकी ती ओकारी तिच्या हाताच्या ओंजळीमध्ये भरली गेली. क्षणभर तिला काय झाले ते कळले नाही. जेव्हा तिला कळले तेंव्हा तिने एकदम "या ssss ब s s या" असे ओरडून ती ओकारी उडवली. त्याचे शिंतोडे आजूबाजूने जाणाऱ्या
लोकांच्या अंगावर.!!

३. पुण्यातील एका सिग्नलवरचा किस्सा.
P.M.T. (पुणे म्युनिसिपल ट्रांस्पोर्ट म्हणा किंवा पत्र्याचे मोडके टमरेल म्हणा) सिग्नल ला थांबली होती.  एका मुलाला जोरात खोकला येत होता.

त्याची आई त्याच्या पाठीवरून हात फिरवत होती. आणि अचानक तो मुलगा त्या बस च्या खिडकीतून खाली ओकला. ति ओकारी, खाली दुचाकीवर बसलेल्या तरुणाच्या हेल्मेटावरून, ओघळत, समोरच्या काचेवरून दुचाकीवर येऊन विसावली.

तुमचे ही असेच काही किस्से असतील तर जरूर कळवा.

अनिकेत

Post to Feedप्रशासक, तुम्ही कुठे
का? काय झाले??
क्षार आणि पाणी
आवडले
छान
एक अधूरी कहाणी
व्याक.....
ओकारी...
नॉशिएटींग!
पुढच्या लेखांची
सही ...ः)
अनिकेतचे संकेत स्थळ
बंदी...
क्षमस्व
प्रतिसाद देताना
सहमत !
शेवटचा प्रतिसाद,
रागावू नका
हम्म्म...
राग नका मानू...
हसूनहसून ओकारी आली....
हा हा हा हा
नवरस
विनोद..?
विनोद?
काहीहीहीहीही!
विकृती
विकृती

Typing help hide