मेघदूत (श्लोक १५-१८)

रत्नच्छायाव्यतिकर इव प्रेक्ष्यमेतत् पुरस्ताद् वल्मीकाग्रात् प्रभवति धनुष्खण्डमाखण्डलस्य ।
येन श्यामं वपुरतितरां कान्तिमापत्स्यते ते बर्हेणेव स्फुरितरुचिना गोपवेशस्य विष्णोः ।। १५ ।।


वारुळाचे टोक इंद्रधनुते प्रकाशले
प्रभावळ मनोरम रत्नांची जडलीसे
श्यामवर्णाते तुझिया झळाळी चढतसे
मोरपीस मस्तकी श्रीहरीच्या गोपवेषे


त्वय्यायत्तं कृषिफलमिति भ्रूविलासानभिज्ञैः प्रीतिस्निग्धैर्जनपदवधूलोचनैः पीयमानः ।
सद्यःसीरोत्कषणसुरभि क्षेत्रमारुह्य मालं किंचित्पश्चाद्व्रज लघुगतिर्भूय एवोत्तरेण ।। १६ ।।


पापण्या बहु स्नेहाळ सुहासिनींच्या आनंदल्या
करतील तव नांगरणी मनी कल्पना सुगीच्या
धर प्रतिच्य थोडी पुनश्च मार्ग नंतर उत्तरेचा
चढावात मोहरल्या भूमीवरोनी मालाप्रदेशाच्या


त्वामासारप्रशमितवनोपप्लवं साधु मूर्ध्ना वक्ष्यत्यध्वश्रमपरिगतं सानुमानाम्रकूटः ।
न क्षुद्रोऽपि प्रथमसुकृतापेक्षया संश्रयाय प्राप्ते मित्रे भवति विमुखः किं पुनर्यस्तथोच्चैः ।। १७ ।।


आम्रकुट गिरी घेईल तुजसी शिरी
स्मरूनी उरी नाचल्या होत्या सरी
शमविले परि वनाचे दावानाल तरी
शिणलास जरी, मार्ग तुझा नभावरी


सानही धरी छत्र मदतीचे न अंतरी
आठवे बरी केले जव तया उपकारी
संशय न करी जाणतो पहा व्यवहारी
उन्नतांची रिती असतेच सदा न्यारी


छन्नोपान्तः परिणतफलद्योतिभिः काननाम्रैः त्वय्यारूढे शिखरमचलः स्निग्धवेणीसवर्णे ।
नूनं यास्यत्यमरमिथुनप्रेक्षणीयमवस्थां मध्ये श्यामः स्तन इव भुवः शेषविस्तारपाण्डुः ।। १८ ।।


तेल श्याम वेणीवरी तैसी तुझी कांती
सुशोभियले उजळत्या गिरिसी तरूंनी
आम्राचिया पक्वांनी भासे स्तनाग्र वसुधे
दिव्य लावण्य पाहतील स्वर्गीची युगुले


टिप - प्रतिच्य म्हणजे पश्चिम दिशा.


(क्रमशः)