चित्रपट व क्रीडा क्षेत्रात आरक्षण

आरक्षणामुळे दुर्बल घटकांची प्रगती होऊन ते सक्षम व पर्यायाने देश प्रगत होणार असेल तर आरक्षण केवळ शिक्षण वा नोकरीमध्येच का असावे? चित्रपट व क्रीडा क्षेत्रात आरक्षण का नको?


चित्रपटात अभिनय, दिग्दर्शन, कथा, तांत्रिक बाबी, केशभूषा, वेशभूषा इत्यादी सर्व क्षेत्रात आरक्षण लागू करून दाखवावे, त्यायोगे सर्वत्र सरकारचे कौतुक होईल. तसेच क्रिकेट पासून ते टेनिस आणि धावण्यापासून ते नेमबाजी पर्यंत सर्व चमूंमध्ये ताबडतोब आरक्षण लागू करावे. नुसते आरक्षण लागू करून भागणार नाही तर नियमही बदलावे लागतील. उदाहरणार्थः जेव्हा आरक्षित फलंदाज फलंदाजी करेल तेंव्हा चौकार/ षट्काराची सीमारेषा आत घेतली जावी तसेच आरक्षित नेमबाज जेव्हा नेम बंदूक सरसावेल तेंव्हा लक्ष्याचा आकार वाढवला जावा.


प्रगती सर्वांगीण हवी. नुसते शिक्षण काय कामाचे?