आसवांनी मी मला भिजवू कशाला?
गाडल्या गेलो पुन्हा रुजवू कशाला?
राखतो रक्तात मीही ऊब थोडी
वाहणारे रक्त मी थिजवू कशाला?
भागते का भूक बोलाच्या कढीने ?
जेवण्याचे बेत मी शिजवू कशाला?
खेळ होतो जीवणाशी चंदनाच्या
मी तरी मजला असे झिजवू कशाला?
संपण्याचा हट्टही माझाच होता
राखरांगोळी अता सजवू कशाला?
शिवश्री गणेश धामोडकर