देवांचा मोर्चा

एकदा सहज बाहेर डोकावलो
आणि आश्चर्याने थक्क झालो
सगळीकडे एकच चर्चा
देवांनी होता काढला मोर्चा
म्हणे सगळीकडेच रडारड
देवपण आता झालय जड
संख्येनेही मोजकेच उरलो
सगळीकडेच परके ठरलो
मागणे हेच सर्वां मुखी
अल्पसंख्यांकांचा दर्जा हवा
सवलती द्या ठेवा सुखी


सुधीर