पालक पुरी

  • १ पालक जुडी
  • ५-६ हिरव्या मिरच्या, ५-६ लसुण पाकळ्या, छोटा आल्याचा तुकडा
  • मीठ, हळद, १ चमचा तीळ, कच्चा मसाला
  • गव्हाचे पीठ, हरभरा डाळीचे पीठ
  • तेल
३० मिनिटे
४-५ जणांना

पालक निवडुन पाने धुवुन घ्यावीत.

पालकाची पाने, हिरव्या मिरच्या, लसुण पाकळ्या, आल्याचा तुकडा, हे सर्व थोडे पाणी घालुन मिक्सर मध्ये बारिक करुन घ्यावे.

या मिश्रणामध्ये चवीपुरते मीठ, हळद, तीळ, कच्चा मसाला, २ चमचे  हरभरा डाळीचे पीठ, गव्हाचे पीठ, आणि ४-५ चमचे तेल गरम करुन घालावे. आणि चांगले मळुन घ्यावे.

मळलेल्या पिठाचे छोटे-छोटे गोळे करुन पुरी लाटावी.

आणि तेल गरम करुन पुऱ्या तळुन घ्या.

या पुऱ्या लोणच्याबरोबर किंवा दह्याबरोबर खायला द्याव्या.

  

 

 

 

 

पीठ मळताना वरुन पाणी घालू नये, म्हणजे मळलेल्या पिठाचा रंग हिरवा राहील. आणि पुरी तळल्यावर खूप छान दिसेल.

आणि पुरी खायला सुद्धा छान लागेल.

स्वतःचा अनुभव