टोमॅटो - कैरीची चटणी

  • १ टोमॅटो
  • १/२ कैरी किसून
  • १/२ वाटी ओलं खोबरं
  • १/२ वाटीपेक्षा थोडे जास्त भाजून सोललेले दाणे
  • २ हिरव्या मिरच्या
  • १ इंच आलं, १ लसूण पाकळी, १ चमचा जीरे पूड
३० मिनिटे
५ ते ७

- वरील सगळे जिन्नस एकत्र करून वाटावे. (मिक्सर म्हणायचे टाळले)

- तेल, हिंगं, सुकी लाल मिरची, आणि भरपूर कढीलिंब घालून फोडणी करावी

- फोडणी वरील वाटलेल्या मिश्रणात घालून चमच्याने मिसळावी. मग हे मिश्रण पुन्हा वाटावे

ही कृती एका तामिळ मैत्रिणीनी सांगितली आहे. डोसा, ऊत्तप्पा, ईडली इ. दाक्षिणात्य पदार्थांबरोबर मस्त लागते. सोबत सांबार असेल तर दुधात साखर! - किंवा सांबरात ईडली म्हणा ना! ;-)

फोडणी घालून पुन्हा मिक्सर मधुन काढण्यची युक्ती कुठ्ल्याही खोबऱ्याच्या चटणीला लागू पडेल. 

मोहोरी आणि कधिलिंब चटणीत छान एकजीव झाल्यामुळे चविष्ट लागते.

मीरा रामस्वामी - कचेरीतिल तामीळ मैत्रीण