मनोगत तबकडीवर उपलब्ध

मनोगतावरचा 'तो' ५ तारखेला पुण्याहून त्याच्या गावी गेला. 'तो' दिल्ली IIT  ला होता. तेथे त्याने मनोगताची तबकडी बनवली होती. त्याची एक प्रत त्याने मला दिली आहे.


या तबकडीवर २००४ ते २००६ पर्यंतचे लेख आहेत. मनोगतावर असल्यासारखेच येथे सुद्धा वावर करता येतो. मात्र येथे एक अडचण आहे ती म्हणजे यात प्रतिसाद उघडत नाहीत. मात्र सगळे लेख उत्तम काम करताहेत. जालजोडणी असल्यासारखे पाने उघडतात.


कुणा मनोगतीला याची प्रत हवी असल्यास मला व्य. नी. पाठवावा. मी पुण्यात असतो त्यामुळे पुण्यातील मनोगतींना सहज देता येईल.


या तबकडीसाठी  त्याला धन्यवाद.


नीलकांत.