संतांची मराठी भाषा

मराठी संतांचे वाङ्मय बहुतांश अभंगस्वरूपात आहे.या संतांपैकी ज्ञानेश्वर आणि एकनाथ सोडले तर बाकी बहुजनसमाजातून आलेले आहेत पण त्यांचे अभंग पाहिले तर त्यातील मराठी अगदी संस्कृतप्रचुर आहे असे दिसते.खरे तर  त्यांनी त्यांच्या बोलीभाषेत लिहिले असते तर ते अधिक स्वाभाविक वाटले असते.(अगदी अलिकडील कवयित्री संत बहिणाबाई यांचे अभंग त्यांच्या बोली भाषेत आहेत ) या संतांना जो  समाज अभिप्रेत होता त्यालाही ती बोलीभाषाच अधिक भावली असती असे असताना त्यानी आपले विचार इतक्या संस्कृतप्रचुर भाषेत मांडले यास काय कारण असावे?