झटपट रवा उत्तप्पे

  • २ वाट्या रवा
  • १/२ वाटी तांदूळ पिठी
  • १/२ कांदा, १ टोमॅटो बारीक चिरून
  • १ इंचं आलं किसून, १-२ लसूण पाकळी ठेचून
  • २ हिरव्या मिरच्या, मूठ्भर कोथिंबीर बारीक चिरून
  • दही
३० मिनिटे
३-४

दही सोडून सगळे जिन्नस एका मोठ्या भांड्यात एकत्र करावे.

थालिपीठाचे पीठ जितके ओले असते तितके ओले होईपर्यंत या मिश्रणात दही घालावे.

आवश्यकतेनुसार पाणी घालावे - डोश्याच्या पिठापेक्षा जाडसर ठेवावे. 

हे पीठ १० मिनिटे झाकून ठेवावे.

लगेच उत्त्प्पे घालायला तयार!!

उत्तप्पे घालण्यापूर्वी तवा भरपूर तापवावा.

कुरकुरीतपणा वाढवण्यासाठी जास्त रवा आणि कमी तांदुळ पिठी घालावी.

कांदा, टोमॅटो व्यतिरिक्त वेगवेगळ्या रंगाच्या भोपळी मिरच्या किंवा ईतर भाज्या घातल्यास छान लागते.

सांबार, चटणीसोबत मस्त लागतात!

मावशी - डॉ. सौ. आशा बडवे