मनोगत बंद आहे

मनोगत बंद असणे, उघडताना वेळ लागणे, मधून मधून जाब द्यावा लागणे ह्याचा एक चांगला परिणाम म्हणजे आपोआप तुमचे मनोगताचे लागलेले व्यसन सुटेल.


दर अर्ध्या तासाने क ने कुठले प्रवास वर्णन लिहिले, ट ची "प" च्या कवितेवर काय टीका झाली,  मला कोणी व्य. नि. पाठविला आहे का? अशा रितीने मनोगतावर पडीक आता कमी होतील.


"मायबोली" वरची वर्दळ बहुतेक वाढेल.


लोकांची कामे पटपट होतील.  जोडीदार(spouse) आता खूष होतील, कारण रोहिणी-विनायकांसारखी जोडगोळी अपवादात्मकच असते.


दोन वर्षे अतिवेगाने वाढणाऱ्या या वृक्षाची वाढ यामुळे काबूत येईल असे वाटते.


कलोअ,
सुभाष