जसे आठ्वले तसे

जगरहाटीत जगताना


स्वतः ला विसरण्याचा प्रयत्न केला


ध्येयासक्तीने धावताना


घराशी फारकतीचा प्रयत्न केला


थकली पावले धावून परदेशात जेव्हा


मायेचे चार शब्द शोधण्याचा प्रयत्न व्यर्थ गेला