जून २५ २००६

स्त्रियांची वेषभूषा व बलात्कार.

काही महिन्यांपूर्वी दूरदर्शनवर "आमने सामने" या कार्यक्रमांत "स्त्रियांवर होणारे बलात्कार" या विषयावर चर्चा झाली होती. त्यांत मुख्य सहभाग असलेल्या पुरुषाने जेव्हा "आजकाल स्त्रिया उत्तान कपडे घालून अंगप्रदर्शन करतात म्हणून बलात्काराची प्रकरणे ज्यास्त प्रमाणांत होतात" असे विधान केले तेव्हा चर्चेंतील सहभागी स्त्रियांनी त्याला जोरदार आक्षेप घेऊन असा प्रतिप्रश्न केला होता की, जेव्हा एखाद्या अल्पवयीन मुलीवर किंवा सत्तर वर्षाच्या म्हातारीवर बलात्कार होतो त्यावेळी त्यांनी कुठे उत्तान कपडे घातलेले असतात वा अंगप्रदर्शन केलेले असते? किंबहुना कोणत्याही बलात्कारित स्त्रीने तसे केलेले नसते असेही पुढे सांगण्यांत आले. बलात्कारित स्त्रीपुरताच विचार केल्यास स्त्रीपक्षाचे वरील विधान असत्य आहे असे कोणीही म्हणणार नाही. पण त्यावेळी त्यावर व्हावी तशी सर्वांगाने खोलांत चर्चा झाली नाही व सूत्रसंचालकाने (कदाचित वेळ मर्यादित असल्यामुळे असेल) घाईघाईने स्त्रीपक्षाचा मुद्दा बिनतोड असल्याचे शिक्कामोर्तब केले. त्यामुळे अंगप्रदर्शन करणारे कपडे घालण्यांत काहीही गैर नाही असा चुकीचा संदेश पसरण्याची शक्यता निर्माण झाली. पण माणसाचे मनोव्यापार व वर्तणूक यांतील संबंधाचा मानसशास्त्रीय दृष्टीने खोलांत विचार केल्यास अंगप्रदर्शन करणारे उत्तान कपडे व होणारे बलात्कार यांतील संबंध लक्षांत येईल.

ज्यावेळी एखादा पुरुष सिनेमाच्या पडद्यावर अथवा दूरदर्शनवर अथवा प्रत्यक्षांत रस्त्यावर किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी स्त्रीचे अंगप्रदर्शन बघतो त्यावेळी निसर्गतःच त्याची कामेच्छा उद्दीपित होते पण नैसर्गिक कृतीने तिची ताबडतोब पूर्तता करणे परिस्थितीमुळे किंवा सामाजिक दडपणामुळे शक्य नसते. त्यामुळे ती इच्छा दडपून टाकली जाते. सर्व मानसशास्त्रज्ञांचे यावर एकमत आहे की या दडपलेल्या इच्छा नष्ट होत नाहीत. फक्त त्या जाणीवेंतून नेणीवेंत जातात. असे बाह्य जगतांतून कामेच्छा उद्दीपित करणारे आघात एकसारखे होत राहिले (आणि आजकालच्या जगांत असे आघात वारंवार होत असतात) व इच्छापूर्ति लांबणीवर पडत गेली की दडपलेल्या इच्छेचा दाब वाढत जातो व बाह्य जगांतील एखाद्या लहानशा आघातामुळेही ती अपुरी इच्छा साचलेल्या पूर्ण शक्तीनिशी नेणीवेंतून जाणीवेंत येते व पूर्णपणे जाणीव व्यापून टाकते. कामेच्छापूर्तीची निकड निर्माण होते. तिचे सावट माणसाच्या विचारशक्तीवर पडते. या शुद्ध-बुद्ध हरपलेल्या अवस्थेंत सारासार विचार नष्ट होतो व धोकेही ल्क्षांत येत नाहीत. (कामातुराणां न भयं न लज्जा). त्यांतूनही इच्छापूर्तीसाठी सर्वच पुरुष बलात्काराचा मार्ग अवलंबतात असे नाही. काही दिवास्वप्नांत दंग होऊन आपली इच्छा पूर्ण करतात. फार थोडे कलानिर्मिति करतात. तर काहीजण त्यांतल्या त्यांत त्या अवस्थेंत सुरक्षित वाटणारा मार्ग शोधतात व जी स्त्री सहजसाध्य वाटते तिच्याकडून तिच्या संमतीची पर्वा न करता इच्छा पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न करतात. त्यावेळी या माणसांच्या जाणीवेवर इच्छेचा एवढा जबरदस्त पगडा असतो की स्त्रीचे मन तर सोडाच पण तिचे वास्तव स्वरूपही त्यांना दिसत नाही.

वरील विवेचनावरून असे दिसून येईल की लोक काय म्हणतील त्याला न जुमानता व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली अंगप्रदर्शन करणारे कपडे घालणारी स्त्री पुरुषांची अविचारी कृत्यांत परिणत होणारी अधीरता वाढवण्यास कारणीभूत होते ज्यामुळे (अंगप्रदर्शन न करणाऱ्या) इतर स्त्रियांवर बलात्कार होण्याची शक्यता वाढते. म्हणून उपरोल्लेखित दूरदर्शनवरील चर्चेंत सहभागी असलेल्या पुरुषाने केलेले विधान बलात्कारित स्त्रीच्या एकटीपुरत्या संदर्भांत खरे नसल्याचे आढळून येत असले तरी संपूर्ण समाजाच्या संदर्भांत ते खरे ठरते; निदान दुर्लक्ष करण्यासारखे तरी नाही.      

आपणास काय वाटते?

टीप - वरील आशयाचे पत्र मी म. टा. ला पाठवले होते. त्यांनी (काही काटछाट करून) ते छापले होते. त्यावर एका पत्रलेखक महिलेने माझ्या पत्रात तिला दिसलेल्या पुरुषी "विकृति"चा निषेध केला होता.

Post to Feed

दोन्ही पण...
असहमत
सहमत
थोडा वेगळा विषय
विकृती मनातच; बाहेर नाही!
मिठाई
समर्थन?
पटले नाही.
सहमत
काळजी नको
अभिनंदन
चर्चेचे सार
भर
कपड्यांची लक्तरे
जाणकार भेटले
ह्म्म
प्रतिसाद निलाजरा आणि विकृत आहे.
जागते राहा!!
कदाचित होय
मुलगा झाला हो
नवल ते काय
बलात्कारीत स्त्री
बलात्कारीत स्त्री व वेशभूषा..
राम, लक्ष्मण आणि हनुमानाला विसरलो.
असहमत
तेवढे एकच धरून बसू नका
कोणत्या स्त्रीया?
शूर्पणखा
असहमत
अहिरावण महीरावण
अहिरावण महीरावण
अहिरावण महीरावण
अहिरावण महीरावण
सीता आणि उर्मिला
प्रिन्सेस डायना
सहमत
रामायण
श्रीकृष्ण = पुरुषोत्तम
सहमत तरी चुकीचे अर्थ नकोत
माना मानव वा परमेश्वर
मूळ विषयाकडे दुर्लक्ष!
कपडे आणि वृत्ती
हा! हा! हा!
सुधारणा/ चित्र
हलकेच घ्या
आणखी काही मुद्दे
आंबट्शौक
स्त्रीची देहबोली... वि. पाशवी नजर
पटले
सहमत

Typing help hide