पसारा

बागेतल्या फ़ुलांचा सुटला सुवास सारा
कवळी कवेत त्यांना हा गंध धुंद वारा


दाही दिशा प्रसन्न मन चिंब चिंब झाले
रंगात रंगुनिया आभाळ मस्त गेले


मस्तीत आपुल्याच घेतो धनेश तान
प्रियेपुढे त्याला न उरले मुळीच भान


स्वर्ग़ीय दृष्य सारे स्वर्ग़ीय हा नजारा
सार क्षणीक आहे हा हास भास सारा


येथे तना मनाची ही भुक सत्य आहे
बाकी असत्य सारे सारा वृथा पसारा