ओळख

नमस्कार मंडळी,


मी एक सामान्य मनोगती, मला फार छान लिहिता येत नाही म्हणून कधी लिहायच्या भानगडीत पडलो नाही. पण आपल्या सगळ्यांचे वाचताना एक समाधान वाटते. मनापासून लिहिलेले लेख, कथा, कविता आणि बरेच 'साहित्य'. साहित्य म्हणण्याला कारण की घरी असलो, आणि फावला वेळ असला की हमखास काहीतरी वाचता येते पण office मध्ये वेळ असला की येथे एक चक्कर होते आणि हे जाणवते की इथे मी जे वाचतो ते फारच सुंदर आहे.


मनोगत हे आता माझा एक अविभाज्य घटक झाले आहे.


मला मनोगतावर एक सूचना करावीशी वाटते - येथे अनेक मनोगती आता एकमेकांना मनोगतवरच्या नावांवरून ओळखतात जसे- टग्या, विसोबा खेचर (तात्या), तो..... आणि काही खऱ्या नावावरून उदा. वेदश्री, प्रियाली, सन्जोप राव...... आपणा सर्वांमध्ये आता एक नाते तयार झाले आहे असे मला वाटते.काही मनोगती अधून मधून भेटतात तर काहींना फक्त मायाजालावरूनच भेटता येते. मला असे मनापासून वाटते की जर आपल्यातील प्रत्येकाने जर आपली थोडक्यात ओळख करून दिली तर मनोगतवरील आपल्या चर्चांना अजून मजा येईल.


सुरुवात माझ्यापासूनच करतो,


मी ध्रुव मुळ्ये.


नुकताच अभियंता म्हणून एका महाविद्यालयातून बाहेर पडून आता सध्या पुण्यात एका खासगी कंपनीत कामाला आहे.


मला गिर्यारोहणाची आणि छायाचित्रीकरणाची आवड आहे.


 


 वरील लिखाणात काही चूक आढळली तर चूक भूल........


तसेच वर काही मनोगतींची मी नावे लिहिली आहेत, तरी प्रत्येक नावापुढे दादा/ताई यथायोग्य लावावे ही मनापासून विनंती.


लेखनाबद्दल अथवा कुठल्याही मुद्द्याबद्दल सूचनांचे स्वागत.


चिकू